गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सावनेर : गजानन अर्बन क्रेडीट सहकारी संस्था मर्या . सावनेर ह्या संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतिच पार पडली.परंतु कोव्हीड -१ ९ च्या माहामारीमुळे शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन होता , त्यामुळे ही सभा स्थगीत करण्यात आली . ही स्थगीत केलेली सभा दि . ३०/०३/२०२१ रोज मंगळवारला सकाळी १०:०० वाजता स्थगीत झालेल्या सभेच्या विषयावर चर्चा करण्याकरीता ऑनलाईन घेण्याचे निश्चित केलेले होते . सभे मध्ये अनेक विषयांवर शांततेत चर्चा झाली व संस्थेच्या भावी वाटचालीकरिता अनेकांनी शुभेच्छा दिल्या . संस्थेची सर्वसाधारण सभा हे सावनेर येथील कार्यालयात स्मार्ट फोन , लॅपटॉप आणि संगणक या माध्यमातून घेण्यात आली.

उपाध्यक्षा श्रीमती नलिनी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभेला श्री यशवंत जुनघरे , डॉ अशोककुमार जैस्वाल , नरेंद्र वाघेला , मनोज बसवार , मारोती धकाते , मदन शेंडे , प्रमोद चकोले , घनश्याम पोटोडे ,नारायण मतेल शंकर बावने, भवना पटेल , अरूण गणोरकर हे संचालक मंडळ , संस्थेचे कर्मचारी संजय राऊत, सुरेश कलकोटवार तसेच सभासद , दैनिक ठेव प्रतिनिधी , सभेला उपस्थित होते .
प्रास्ताविक भाषण व आभार संस्थेचे व्यवस्थापक कमलाकर महल्ले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

क्रीडाविषयक कामगिरी उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करावे – क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार

Sun Apr 4 , 2021
क्रीडाविषयक कामगिरी उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करावे – क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार मुंबई : राज्याची क्रीडाविषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य शासनाचा क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. लष्कर आणि […]

You May Like

Archives

Categories

Meta