पारशिवनीत सहा दिवसात सात घरी घरफोडी,१,९५लाख चा माल लंपास

पारशिवनीत सहा दिवसात सात घरी घरफोडी,१,९५लाख चा माल लंपास

कमलासिहं यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी

 

पाराशिवनी(ता प्र) :-पारशिवनी तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच कोंढासावली येथे २८ सेप्टेबर ला चार घरी ६९,ह्जार व बाबुलवाडा येथे ३०सेव्टेबर ला एक घर ७४ हजार ची घरफोड़ी नतर पुन्हा चोरीला दोन दिवस लोटत नाही तर शुक्रवारी (२ ऑक्टोबर) भर दुपारी चोरांनी दोन घरी ने ५२हजार ची घरफोडीत असे एकुणा १,९५,००० ची चोरी पारशिवनी र्षोलिस स्टेशन ह्हीत झाली .
पाराशिवनी येथील वैष्णव नगरी ले-आऊटमधील अनिल कभे यांच्या घरी चोरांनी समोरील दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली. ते दुपारी १२.३0 वाजता परिवारासह नागपूरला जाण्याकरिता घरून निघून गेले होते. यावेळी त्यांचे किरायेदार हे सावनेरला दवाखान्यात जाण्याकरिता गेले होते. किरायेदार कुम्माजी कोडवते दुपारी १.३0 वाजता घरी आले तेव्हा त्यांना कभे यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच स्वत:च्या रुमचे कुलूप देखील तुटलेले आढळले. दोन्ही घरचे सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. कभे यांच्या कपाटातून एक १२ ग्रामचा सोन्याचा गोफ, काही चांदीचे दागिणे व रोख ७ हजार रुपये नगदी एकूण ७२ हजारांचा ऐवज चोरी गेला. तर त्यांचे किरायेदार कुम्माजी कोडवते यांच्या घरून कानातील दागिणे, अंगठी, पोत, जोडवी, मुखडा, असे एकूण ५२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. पारशिवनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पारशिवनी पोलिस अज्ञात चोरट्यांचा विरूद भा द वी ४५७,३८० ने गुन्हा नोंद करून अज्ञात चोराचा शोध घेत आहे. तर पारशिवनी शहरात तसेच ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत गाई बैल चोराना,व घरफोडी चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केंन्द्र सरकार चा विरोधात कॉंग्रेस ने केेले आंदोलन

Tue Oct 6 , 2020
केंन्द्र सरकार चा विरोधात कॉंग्रेस ने केेले आंदोलन #) निवेदनाने कृषी व कामगार विधेयक मागे घेण्याची केली मागणी.  कन्हान : –  कृषी विधेयक व कामगार विधेयक बिल घाईघाईने मंजुर केल्याच्या विरोधात कन्हान येथे शुक्रवारी सायंकाळी काँग्रेस पार्टी च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन आंबेडकर चौक पासुन गांधी चौक पर्यंत विशाल मोर्चा […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta