पुसद मतदार संघांचे आमदार इंद्रणिल नाईक यांची घाटंजी कोविड सेंटर ला भेट

*पुसद मतदार संघांचे आमदार इंद्रणिल नाईक यांची घाटंजी कोविड सेंटर ला भेट*

घाटंजी : तालुक्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राष्ट्रवादी विद्यार्थी पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तथा उपसरपंच रितेश बोबडे बऱ्याच दिवसांपासून तालुका कोविड सेंटरला ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध व्हावी या करिता कित्येक दिवसापासून तालुका आरोग्य विभाग, यवतमाळ जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष भेटून मागणी करत आहे पण कुठेही यश मिळाले नाही पण घाटंजी तालुक्यातील बाधीतांचा आकडा आवाक्या बाहेर जात असतांनाच याची माहिती पुसद मतदार संघातील युवा आमदार इंद्रनील नाईक यांना दिली आणि या माहितीची दखल घेत यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे लोकाभिमुख दमदार नेतृत्व आमदार इंद्रनील नाईक यांनी जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे यांच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्या मुळे घाटंजी कोविड सेंटर ला भेट दिली. कोविड सेंटर वरील समस्या सोयी सुविधांवर चर्चा ,रुगांची विचारणा या वेळी केल्या गेली. दिवसेंदिवस वाढती रुग्णाची संख्या बघता सेंटर ला ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची नितांत आवशक्यता आहे ही बाब त्यांच्या डोळ्यासमोर पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आणून दिली. कुठल्याही रुग्णांस वेळेवर अडचण आल्यास आपल्या कडे यवतमाळला जाण्याशिवाय पर्याय नाही आणि जिल्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला चांगल्याने माहिती असल्याची जाणीव करून देत तालुका COVID सेंटर ला 10 ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सोय करून द्यावी या करिता सर्व राष्ट्रवादी युवा पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. या प्रसंगी जिल्हाधिकारी साहेब सोबतच असल्यामुळे आमदार महोदयांनी व जिल्हाधिकारी साहेबांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली व मागणी मंजूर करून घेतली. येत्या काही दिवसात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर उपलब्द होईल अशी ग्वाही आमदार महोदयांनी दिली.त्यानंतर कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून धीर दिला. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना औषधोपचारा सोबतच मानसिक आधाराची गरज असते. मात्र, त्यांच्या नातेवाईकांना यासंबंधी मर्यादा येतात. ही बाब लक्षात घेतआमदार साहेबांनी प्रत्यक्ष जाऊन संवाद साधला व त्यांचे मनोबल वाढविण्या करिता रुग्णांना धीर दिला यावेळी ते बोलतांना म्हणाले आपण प्रत्येजण योद्धा आहोत. ही लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे. परिस्थिती जरी गंभीर असेल पण कोरोनाने आपल्याला घेरलय म्हणून घाबरून न जाता आपल्याला लडा द्यायचा आहे. तिकडे रेमडीसीवीर इंजेक्शन अभावी कित्येक निष्पाप लोकांचे जीव जाताहेत परंतु आपल्याला रेमडीसीवर ची आवश्यकताच पडणार नाही अशी आपली वेवस्था इथे नक्कीच होईल.आपली परंपरा लढण्याची आहे, या कठीण काळाशी आपण लढतोय, मला विश्वास आहे, कोरोना च्या या दृष्टचक्रातून आपण सगळे नक्कीच बाहेर पडू. असा भक्कम आधार त्यांनी दिला, व रुग्णांना काहीही काम पडल्यास थेट स्वतः संपर्क करा असा शब्द त्यांनी दिला.या प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे, तालुका अध्यक्ष कैलास कोरवते ,राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे शहर अध्यक्ष संजय आडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष विश्वास निकम, राष्ट्रवादी चे संजय ढगले, आशिष भोयर, उपजिल्हाध्यक्ष भाविक भगत, प्रज्वल भुरके, निसार शैक, संकेत धांदे व सहकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जनावरांची अवैधरित्या वाहतूक ,१,लाख६३,हजार चा मुद्देमाल जप्त

Sun May 9 , 2021
*मौजा नयाकुंड शिवारात जनावरांची अवैधरित्या वाहतूक ,१,लाख६३,हजार चा मुद्देमाल जप्त* पारशिवनी तालुका प्रतिनिधी *पारशिवनी*(ता प्र):-मौजा नयाकुंड शिवारातून अवैधरित्या जनावरांना निर्दयतेने कोंबून गुरुवार, ६ मे रोजी होत असलेली तस्करी रोखून जनावरांना जीवदान देण्यात पारशिवनी पोलिसांच्या सतर्कतेमुळे यश आले. सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी पहाटे ३ वाजतादरम्यान पारशिवनी पोलिस पथक पेट्रोलिंग करून […]

You May Like

Archives

Categories

Meta