जनावरांची अवैधरित्या वाहतूक ,१,लाख६३,हजार चा मुद्देमाल जप्त

*मौजा नयाकुंड शिवारात जनावरांची अवैधरित्या वाहतूक ,१,लाख६३,हजार चा मुद्देमाल जप्त*

पारशिवनी तालुका प्रतिनिधी

*पारशिवनी*(ता प्र):-मौजा नयाकुंड शिवारातून अवैधरित्या जनावरांना निर्दयतेने कोंबून गुरुवार, ६ मे रोजी होत असलेली तस्करी रोखून जनावरांना जीवदान देण्यात पारशिवनी पोलिसांच्या सतर्कतेमुळे यश आले.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी पहाटे ३ वाजतादरम्यान पारशिवनी पोलिस पथक पेट्रोलिंग करून मौजा नयाकुड पेंच नदी त्या पुलाचे आलिकड़े रोड् वर नाकाबंदी करित असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, काही जण विनापरवाना व अवैधरित्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पाराशिवनी पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरिक्षक संदिपान उबाळे , पोलिस नायक रविन्द्र बर्वे, प्रफुल्ल जागनाडे सह पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून चारचाकी सिलवर रंगाची टाटा इंडिका एम. एच. १५ / बी. एक्स. ६७९२ क्रमांकाच्या कारला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये १,कारवड,किमत ३हजार रूपये न १,गोरा किमत ८हजार असे दोन जनावरे अंदाजे किंमत १३ हजार रुपये आढळले. घटनास्थळावरून दोन जनावरे व वाहनासह एकूण किंमत १ लाख ५० हजार रूपये असे एकुण १लाख ६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी सरकारतर्फे पोलिस नायक रवींद्र बर्वे बक्कल नम्बर १४९० यांच्या लेखी तक्रारीवरून कलम ११'(१),(,छ) ,(ड),(च) प्राणयाना निर्दयेतेने बागणुक,प्रतिबंधक आधिनियम १९६० सहकलम ५,(अ)व प्राणी सरक्षणा अधिनियम १९६५ सहकलम ,११९, व मोटार वाहन कायदा सहकलम ३४ अन्वेय आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पाराशिवनी पोलिस निरिक्षक संतोष वैरागाडे चे मार्गदर्शनात गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक संदीप कडू (बक्कल नम्बर ४१८) करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आशुतोष मंडपे यांना पीएचडी पदवी ने सन्मानित

Sun May 9 , 2021
आशुतोष मंडपे यांना पीएचडी पदवी ने सन्मानित कन्हान ता.9 श्री. आशुतोष मंडपे यांना अकॅडेमी ऑफ सायंटिफीक अँड ईन्नोव्हेटीव रिसर्च (ए.सी.एस.आय.आर) कडून इंजीनियरिंग मध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी) ची पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी डॉ सुनील कुमार यांच्या पर्यवेक्षणात “सस्टनेबल युटीलाईझेशन ऑफ फ्लाय एष इन इन-वेसेल कोमपोस्टिंग ऑफ अॅग्रिकल्चरल वेस्ट” […]

You May Like

Archives

Categories

Meta