एक छोटीसी भेट , हितेश दादा बनसोड के संग

#ब्लँकेट वाटप   थंडीचा कहर!


सावनेर  :  काल-परवा पेपर मध्ये बातमी वाचली की थंडीमुळे पाच वृद्धांच्या मृत्यू झाला😢 थंडीमुळे दगावल्याची वृत्त ताजे असतानाच ,महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडला आणि त्या सोबत थंडीचा कडाका वाढला, या थंडीत गारठून पाच वृद्ध लोकांचा बळी गेला खरंतर ही बातमी मनाला दुःख देणारी होती……


मग आपण विचार केला की आपण थोडीफार तरी मदत करू शकतो फक्त व्हाट्सअप स्टेटस ला मी ब्लॅन्केट मदतीचे आवाहन केले आणि त्याला प्रतिसाद सुद्धा लोकांनी दिला ज्यांच्या परीने त्यांनी मला मदत केली आणि बारा हजार रुपये जमा झाले आम्ही नागपूर जाऊन ब्लॅंकेट खरेदी केले, आणि मग काय आम्ही निघालो रस्त्यावर भटकणारे रोडच्या कडेला झोपलेले निराधार बेवारस बेरोजगार लोक यांना ब्लँकेट देण्यात आले ब्लॅंकेट देणे हे तर एक निमित्त होतं ज्या लोकांसोबत संवाद साधता येईल त्यांच्या सोबत संवाद सुद्धा साधला कारण आम्ही सुद्धा शोधत असतो की कोणी भटकले असतील कोणी मनोरुग्ण असेल किंवा कुणाला आपल्या मदतीची गरज असेल आम्ही प्रत्येक त्या व्यक्ती सोबत बोलण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे होते रिझर्व बँक चौका समोर आम्हाला एक व्यक्ती आढळला त्याची आम्हीच सखोल चौकशी केली असता असे कळले की काही दिवस अगोदर त्याचा अपघात झाला होता त्यामध्ये त्यांनी त्याचा एक पाय गमावला कालांतराने त्याला लखवा मारला आणि घरच्या लोकांनी लक्ष देणे बंद केले आणि तो रस्त्यावर आला एक व्यक्ती जो घरच्या त्रासापासून कंटाळून नागपूर मध्ये वास्तव्यास आहे,


आम्ही त्याला विचारले असता त्यांनी घरी जाण्यास नकार दिला नंतर आम्ही कॉटन मार्केट कडे वळलो तिथे एक गृहस्थ एक छोटीशी चादर घेऊन झोपले होते सहज आम्ही तिचा आदर त्यांच्या अंगावर टाकली आणि तो व्यक्ती इतक्या जोरात ओरडत होता की जणू काही खूप मोठे संकट आले असेल जितक्या प्रेमाने त्याच्या अंगावर ब्लॅंकेट टाकले होते त्याने ते ब्लॅंकेट फेकून दिले आणि मी तुम्हाला भिकारी दिसतो का काही काही बोलू लागला नंतर असे कळले की तो बरेच दिवसांपासून रस्त्यावर आहे आणि खूप तापट स्वभावाचे आहे नंतर आम्हालाच असा विचार आला की त्याच्या या स्वभावाने तो रस्त्यावर आहे म्हणून घरच्या लोकांनी त्याच्यावर लक्ष दिले नाही असो आम्ही रेल्वे स्टेशन राम झुला कडे निघालो रस्त्यात एक गृहस्थ भेटले त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मी बोरीवली मुंबई येथून आहे घरी गेलो तर घरचे लोकं पुन्हा हाकलून देतात म्हणून भीक मागून आपला जीवन काढत आहे असे बरेच अनुभव आलेत चांगले पण आले आणि वाईट सुद्धा मला मदत करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुमच्यामुळेच मी सामाजिक कार्य करू शकतो,
शेवटी आर्थिक अडचणी येतातच आमचे हे कार्य लोकसहभागातूनच होत असते आणि तुमच्या सर्वांची मदत हेच आमचे कार्य

“मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या”
हीच खरी माणुसकी आहे
हाच खरा धर्म आहे ते म्हणतात ना

 

हितेशदादा बनसोड 7888161633
( एक छोटासा सामजिक कार्यकर्ता )
सावनेर जिल्हा नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मंडळ अधिकारी व तलाठ्याचे निलंबन वापस घ्या ; आगळ्यावेगळ्या आंदोलनाने तहसील परिसराचे वातवरण भक्तीमय

Mon Dec 27 , 2021
*मंडळ अधिकारी व तलाठ्याचे निलंबन वापस घ्या* *आगळ्यावेगळ्या आंदोलनाने तहसील परिसराचे वातवरण भक्तीमय *मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनास भजन मंडळाची साथ* सावनेरः नागपुर जिल्ह्यातील हिंगणा तहसीलच्या वानाडोंगरीचे मंडळ अधिकारी राजेश चुटे व इनासानीचे पटवारी सतिष तिवारी यांच्यावर मतदान यादीच्या कामात तु्टीपुर्ण कार्य केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याच्या कारवाईच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta