श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे क्रांन्दी- कन्हान शहरात भव्य स्वागत 

*श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे क्रांन्दी-

कन्हान शहरात भव्य स्वागत 

* श्री संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेने कन्हान मायानगरी दुमदुमली…

* संत संताजी जगनाडे महाराज यांचे रथ यात्रेचे स्वागत जल्लोषात….

*महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या द्वारे भव्य आयोजन


कन्हान – श्री संत जगनाडे महाराज यांचे जन्मस्थल चाकण व समाधि स्थल सदुंबरे पुणे येथुन निघालेली रथयात्रा चे आगमन कांद्री (कन्हान) नगरीत होताच संताजी सभागृह येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कांद्री च्या वतीने फुलाच्या वर्षाने चरण पादुकेचे दर्शन घेऊन भव्य स्वागत करण्यात आले .

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्र राज्य च्या वतीने जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पदशिष्ठ श्री संत संताजी महाराज यांचे अध्यामिक व ऐतिहासिक वार्सा संपुर्ण महाराष्ट्रातील समाज बंधु भगीनी यांना परीचित व्हावा या करिता श्री संत जगनाडे महाराज यांची रथयात्रा व पादुका दर्शन, समाज जोडो तसेच ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे बुधवार दिनांक ८ डिसेंबर ला संत जगनाडे यांचे जन्मस्थल चाकण येथुन समाधि स्थल सदुंबरे तालुका चाकण जिल्हा पुणे येथुन संत जगनाडे महाराज यांच्या रथयात्रेचे शुभारंभ करण्यात आले असुन ही रथयात्रा संपुर्ण महाराष्ट्रतील विविध ठिकाणी भ्रमण करुन मंगळवार दिनांक २८ डिसेंबर ला सायंकाळ च्या सुमारास कांद्री (कन्हान) नगरीत आगमन होताच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कांद्री च्या वतीने संताजी सभागृह येथे फुलाच्या वर्षाने जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर संताजी सभागृह मंदिरात श्री संत जगनाडे महाराज, श्री संत तुकाराम महाराज, रुक्मिणी देवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन नमन करण्यात आले असुन संताजी महाराजांचे पादुका व तुकाराम महाराज यांची गाथा समाजबांधवांच्या दर्शनार्थ समोर ठेवण्यात आले असुन शेकडो समाजबांधवांनी दर्शन घेत संताजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी रथयात्रा मध्ये आलेल्या सर्व पाहुणांन्या व स्वागत कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना अल्पोहार व बुंदी वितरण करुन स्वागत कार्यक्रम थाटात संपन्न पार पाडला.

या प्रसंगी नागपूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शरद डोणेकर, कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर, कांद्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे, सदस्य शिवाजी चकोले , महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा तालुका अध्यक्ष संकेत चकोले , तालुका कार्याध्यक्ष सुत्तम मस्के, कांद्री तेली समाज पंच कमेटी चे अध्यक्ष वामन देशमुख , सहसचिव सौरभ डोणेकर ,सुनिल सरोदे पत्रकार, कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष व पत्रकार रुषभ बावनकर, मंच सचिव हरीओम प्रकाश नारायण , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , राहुल वंजारी , विशाल भुते , जयराम मेहरकुळे , राजेश पोटभरे , सौरभ पोटभरे , श्याम मस्के , ईश्वर कांमडे , सह आदि समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येत उपस्तिथ होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

साई मंदिर आडापुल येथे गरजु नागरिकांना कंबल वाटप ; युको सावजी भोजनालयाचे संचालक किरण ठाकुर यांचे जनहितार्थ उपक्रम

Thu Dec 30 , 2021
साई मंदिर आडापुल येथे गरजु नागरिकांना कंबल वाटप #) युको सावजी भोजनालयाचे संचालक किरण ठाकुर यांचे जनहितार्थ उपक्रम. कन्हान : – शहर व परिसरात कडाक्याची थंडी पडत असुन असाहाय नागरिक कसे बसे तरी थंडीचे दिवस काढत असल्याचे पाहता युको सावजी भोजनालय व धाब्याचे संचालक आणि शहर विकास मंचचे सदस्य श्री […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta