अंगणवाडी केंद्रात पोषण आहाराचे वितरण

*अंगणवाडी केंद्रात पोषण आहाराचे वितरण*


कामठी :- गौतम नगर छावणी येथील अंगणवाडी केंद्रात नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते पोषण आहाराचे वितरण नुकतेच करण्यात आले
८६ गरोदर महिलां व तीन ते सहा वयोगटातील ४० बालकांना पोषण आहार देण्यात आला.
पोषण आहारात कडधान्य,साखर,मसाला आदींचा समावेश असून कडधान्य निकृष्ट दर्जाचे मिळते अशी तक्रार लाभार्थ्यांनी केली,याबाबत आमदार टेकचंद सावरकर यांच्या मार्फत महिला व बालविकास मंत्री ना यशोमतीताई ठाकुर यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात येईल असे नगरसेविका रायबोले यांनी सांगितले
यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्त अंगणवाडी केंद्र क्रमांक ५९ च्या अंगणवाडी सेविका अर्चना रामटेके, मदतनीस ममता रामटेके तसेच लाभार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तेजस बहुउद्देशीय संस्थे व्दारे सेवानिवृत किशन अरगुलेवार चा सत्कार

Sun Jul 4 , 2021
तेजस बहुउद्देशीय संस्थे व्दारे सेवानिवृत किशन अरगुलेवार चा सत्कार कन्हान : –  तेजस संस्थेचे सचिव किशन अरगुलेवार हे वेकोलि कोळसा खुली खदान कर्मचारी म्हणुन सेवानिवृत झाल्याने वेकोलि गोंडेगाव कार्यालयाच्या प्रांगणात तेजस संस्थे व्दारे मान्यवरांच्या हस्ते किशन अरगुलेवार हयांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.         तेजस बहुउद्देशीय संस्थेचे सचिव किशन अरगुले […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta