पारशिवनी खापा रोड वर रस्ता दुभाजकावर वाहन आदळल्याने चालकाचा मृत्यू

*पारशिवनी खापा रोड वर रस्ता दुभाजकावर वाहन आदळल्याने चालकाचा मृत्यू*

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी

पाराशिवनी (ताः प्र):-पारशिवनी न्यायालय समोर खापा ला जातांना समोरून येणारे  वाहनाचा लाईट चा उजेड डोळ्यावर पडल्याने मृतक चालकाचे गाडीवरील संतुलन बिघडुन वाहन क्रमांक एम एच ४०,बि एल ०८२९ हा वाहन डिवायटर वर चढुन रोड वर पलटयाने अपघात झाला,. अपघात वाहन चालक व ईतर जख्मी चालकास जास्त मार असल्यामुळे त्याचा उपचार करिता ग्रामिण रुग्णालय येथे नेले असता उपचार दरम्यान वाहन चालक हा मृत झाल्याची घटना घडली.

फिर्यादी अमर नारायण आगंदारी (४५वर्ष) राहणार घुग्गुस ,चंन्दपुर ची रिर्षोट वरून पाशिवनी पोलिसानी अपराध क्रमांक २६६/२०ने नोद करून कलम २७९, ३३७, ३०४(अ) ही घटना दाखल केले ,पारशिवनी-खापा रस्त्यावरील पारशिवनी येथील न्यायालयासमोर बुधवारी (८ ऑक्टोबर) रात्री ८ च्या सुमारास घडली.
मृतकाचे नाव प्रदीप घनश्याम जैना, राहणार ओडिसा, हल्ली मुक्काम मॅग्नीज खदान, रामडोंगरी, खापा. मृतक एम. एच. ४0 / बी. एल. 0८२९ या वाहनाने पारशिवणीकडून खाप्याला जात होता. अशातच पारशिवनी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर त्याच्या डोळ्यावर समोरून येणार्‍या वाहनाचा प्रकाश पडला. त्यातच त्याचे गाडीवरील संतुलन सुटले व गाडी रस्ता दुभाजकावर आदळून उलटी झाली.
वाहनचालक प्रदीप गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. त्याच्यासोबत असलेले काही कामगार किरकोळ जखमी झाले. पुढील तपास पारशिवनी पोलिस करीत आहे.
या मार्गावर कुठेच गतिरोधक पट्टी नसल्याने येथील वाहनचालक सुसाट वेगाने वाहन चालवीत असतात.
मागील अनेक दिवसांपासून या मार्गावर गतिरोधक व रेडियम पट्टी लावण्याची मागणी शहरवासीय करीत असूनसुद्धा या मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक व रेडियम पट्टी न लावल्याने येथे अपघाताचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असून, जिवितहानी होण्याच्या घटनात वाढ होत _आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होऊ नये, याकरिता येथील वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक लावण्याची मागणी केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बाबांच्या सोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.. डाॅ.पुर्णिमा केदार चिंचमालापुरे

Fri Oct 9 , 2020
कोरोना आणि आपण .. अक्षरशः आपण एका वेगळा विश्र्वाची वाट बघत होतो आणि भलतच घडलं. सगळंच जसं थांबून गेलंय… किती तरी लोकं बेरोजगार झाले. किती तरी कुटुंब आपलं पुढे कसं होईल..काय कमवू..कसं कमवू आणि घर कसं सांभाळू या चिंतेत आहेत. भारत च नाही तर संपूर्ण विश्व थांबून गेलं आहे. सगळीकडे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta