कोरोना वाढती संख्या रोखण्याकरि ता कन्हानला जनता कर्फु का नाही?   

कोरोना वाढती संख्या रोखण्याकरिता कन्हानला जनता कर्फु का नाही? 


कन्हान : –  शहर व परिसरात कोरोना रूग्णाची संख्या दिवसेदिवस वाढत असुन रूग्णाचे मुत्यु सुध्दा होत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत कोरोना रूग्णाची वाढती संख्या रोखण्या करिता कन्हान ला आठ ते दहा दिवसा चा जनता कर्फु का नाही ? अशी सर्वसा मान्य नागरिकांत चर्चा हळुहळु जोर धरू लागली आहे. 

         कन्हान शहर व परिसरात कोरोना चा संसर्ग वाढत असुनही नगरपरिषद प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सुस्त असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे. भाजीपाल्यांच्या दुकानात,किराणा दुकानात, बँकेसमोर, मटन मार्केट मध्ये विशेषतः गर्दी दिसुन येते. कन्हान नदी च्या रक्षा घाटावर दररोज नागपुर व बाहेर गावची मंडळी राख विसर्जना करिता चांगलीच गर्दी करून नियमाचे सरास पायमल्ली होत आहे. कोरोनाची कसलीही भीती न बाळगता व सामाजिक अंतराचे भान न ठेवता गर्दी करने नित्याचेच झाले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खब रदारी घेण्या ऐवजी बेजबाबदार नागरिक ,काही व्यापारी बाजारात नियमाचे उल्लं घन करीत आहेत. यामुळे कोरोना आटो क्यात कसा येईल असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला असुन कोरोना कधी कोणाचे दार ठोठावेल याचा नेम राहिला नाही. प्रशासनाने भाकीत वर्तविल्या प्रमा णे सप्टेंबर महिना कोरोनाच्या दृष्टीने सर्वाधिक घातक ठरत आहे. मृत्यृ व रुग्ण संख्या वाढीमुळे दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने नागरिकां च्या बाजारात बिनधास्त फिरण्यावर आणि वाढती कोरोना रूग्णाची साखळी तोडण्याकरिता आता संपुर्ण टाळेबंदी (जनता कर्फु) हाच उपाय असल्याची चर्चा हळुहळु जोर धरू लागली आहे. मार्च महिन्यात संपुर्ण देशात टाळेबंदी लागल्या नंतर कन्हान मध्ये व परिसरात कन्हानच्या पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा फक्त प्रयत्न केला. परंतु टाळे बंदी शिथिल होताच गर्दीकडे त्यांचे दुर्लक्षच होताना दिसते. कन्हान नगर परिषद प्रशासनही लॉऊड स्पीकर गावात फिरवुन नागरिकांना व व्यापाऱ्यांना सुचना देत आपले अस्तित्व असल्याची जाणीव करून दिल्या शिवाय फारसे काही करतांना दिसत नाही. व्यापाऱ्यांचे तोंडें व राजकिय पत पाहुन दंड करण्याचे वा त्यांच्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावुन वचक निर्माणकरण्याची आवश्यकता असताना कन्हान नगरपरिषद प्रशासन व कन्हान पोलीस सुस्तावल्याच चित्र सध्या दिसत आहे. येथील नगरसेवकांनी जरी आपआपल्या प्रभागात लक्ष देत नागरिकांत जनजागृती व अधिका-याना कोरोना संदर्भातील सर्व कामे नियमित व वेळेवर करण्यास भाग पाडण्यास कमी पडत असल्याचे नागरिकांना जानवत आहे. कोरोना चा वाढता प्रादुर्भावाने सर्व सामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत असुन कन्हान ला वाढती कोरोना रूग्णाची साखळी तोडण्याकरिता सृद नागरिकांनाच सामोरा घेऊन कमीत कमी आठ ते दहा दिवसाचा जनता कर्फु (लॉकडाऊन ) करण्याची सर्वसामान्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पतंजलि योग समिति सावनेर भारत थापा यांचे सुयश

Wed Sep 16 , 2020
सावनेर : पतंजलि योग समिति सावनेर चे योग रत्न आणि जिल्हा शोशल मिडिया प्रभारी सावनेर रहवासी भारत थापा यांनी अंतर्राष्ट्रीय योग परीक्षा क्यू.सी.आ. च्या तिसऱ्या टप्यातील झालेली परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आणि हे करणारे भारत थापा हे सावनेर तालुक्यातले पहिले आणि एकमेव व्यक्ति ठरले असुन नागपुर जिल्हासह सावनेर तालुक्याचे […]

You May Like

Archives

Categories

Meta