सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी

*सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी*

#) भाजपा ओबीसी मोर्चा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

कन्हान : – ओबीसी आरक्षण स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका मधील सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय दिल्या बद्द्ल महाराष्ट्र सरकार ने सेवानिवृत्त न्यायाधींशा नेमुण तसेच सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी भाजपा ओबीसी मोर्चा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांनी तहसीलदार श्री वरुण कुमार सहारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवुन केली आहे .


ओबीसी समाजाचा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे ओबीसी समाजातील बंधु व भगीणीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक मध्ये ओबीसी आरक्षण मधुन निवडणुक लढवता येणार नाही. त्यामुळे फारच मोठा अन्याय झाला आहे . महाराष्ट्र सरकारने लवकरच सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच सेवानिवृत्त न्यायाधिंशाची समितीची नेमणुक करण्यात यावी आणि श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी ७ मे २०२१ जी आर आहे. तो जी आर त्वरीत रद्द करण्यात यावे. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय त्वरीत दुर करण्याची मागणी भाजपा ओबीसी मोर्चा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांनी श्री श्री फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे यांच्या उपस्थिती मध्ये व अध्यक्ष नरेश पोटभरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार वरुण कुमार सहारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवुन केली आहे .
या प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री जयराम मेहरकुळे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा अनु: सुचित जाती मोर्चा अध्यक्ष लीलाधर बर्वे , भाजप नेते नरेश मोटघरे,श्री कमलाकरजी मेंघर , रामभाऊ दिवटे , बंडू बावनकुळे, परसराम राऊत , रिंकेश चवरे,अमोल साकोरे, सौरभ पोटभरे, ओमप्रकाश पालिवाल , गुरुदेव चकोले ,सचिन वासनिक ,श्याम भिमटे , ऋषभ बावनकर, अमन घोडेस्वार,शुभम येळणे , पवन वैद्य , प्रशांत देशमुख , सह आदि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान मध्ये पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला

Mon Jun 21 , 2021
कन्हान मध्ये पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला. #) एक आरोपी पोलीसाच्या ताब्यातुन पसार.  कन्हान : – येथील ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश गोडघाटे यांच्या घरावर गावगुंडांनी अश्लिल शिवीगळ करित दरवाज्यावर लाथ, दगड व शस्त्राने मारून जिवे मारण्याचा प्राणघातक हमला केला. अंगणात असलेल्या वॅगनर कार चे काच फोडले.          […]

You May Like

Archives

Categories

Meta