कन्हान च्या विकासाकरिता वेकोलि कामठी उपक्षेत्रा ने सहकार्य करावे – योगेंद्र रंगारी  

कन्हान च्या विकासाकरिता वेकोलि कामठी उपक्षेत्रा ने सहकार्य करावे – योगेंद्र रंगारी

#) आठवडी बाजर व खेळाच्या मैदानास जागा उपलब्ध व तयार करून देण्याची मागणी. 


कन्हान : – शहराला लागुनच असलेल्या वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत असलेल्या खुली कोळसा खदान  च्या कोळसा उत्खनाने परिसरातील नागरिकांना खुली कोळसा खदानच्या ब्लास्टींग, माती डंम्पीग, ट्रक कोळसा वाहतुक व दुषित पाणी कन्हान नदीत सोडल्याने विविध समस्या निर्माण होऊन कन्हान, पिपरी शहरा तील नागरिकांना वायु ,पाणी, धुळ व ध्वनी प्रदुर्शना ने विविध आजाराचा आणि समस्याचा सामना करावा लागतो. या समस्याचे निवारण करून शहराच्या विकासाकरिता आठवडी बाजार व खेळाच्या मैदानास वेकोलिची पडीत जागा उपलब्ध करून दयावी अशी मागणी  न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी व नगरसेवकांनी पत्र परिषदेत केली आहे. 

       नगरपरिषद कन्हान-पिपरी रामटेक लोकसभा व विधानसभा क्षेत्राचे प्रवेश व्दार असुन शहराला लागुनच असलेल्या वेकोलि कामठी उपक्षेत्र अंतर्गत खुली कोळसा खदान च्या ब्लास्टींग, माती डंम्पीग, कोळसा वाहतुक व दुषित पाणी कन्हान नदीत सोडल्याने विविध समस्या निर्माण केल्याने कन्हान, पिपरी शहरातील नागरिकांना वायु ,पाणी, धुळ व ध्वनी प्रदुर्शनाने अनेक आजाराचा आणि समस्याचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय कार्य म्हणुन कोळसा उत्खनास ब्लाॅस्टींग मोठ्या प्रमाणात केली जाते ही त्रिव्रता अधिक असल्याने राहणार लोकांच्या घराला हादरे बसुन कंपन होत असल्याने घरी असलेले वयोवृद्ध, लहान मुले, गृहिणी भयभीत होत आहे. नागरिकांच्या हितार्थ  मोठी दुर्घटना रोखण्याकरिता उपाययोजना म्हणुन ब्लॉस्टींगची त्रिव्रता कमी करून वेकोलि निर्मित विवि ध समस्याचे निवारण कऱण्यात यावे. शहराची लोक संख्या झपाट्याने वाढत असल्याने विकास कामे व सोई सुविधा नगरपरीषदे व्दारे जनते ला देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आवश्यक गरजा लक्षात घेता वेकोली प्रशासनाने रायनगर कन्हान व दखने हायस्कुल जवळ असलेली पडीत जागा गुजरी, आठवडी बाजारास तसेच मुलाना विविध खेळ खेळण्यास व जेष्ट नागरिकांना विरूगंळा, मनोरंजनाकरिता पुरेशी आहे. यास्तव शहराच्या विकासाकरिता सहकार्य करून आठवडी बाजार व खेळाच्या मैदानास वेकोलि ची रायनगर व दखने हायस्कुल जवळील पडीत जागा गुजरी, आठवडी बाजारा करिता आणि खेळाच्या मैदानाकरिता उपलब्ध व तयार करून दयावी अशी मागणी न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी यांनी पत्रपरिषदेत मागणी केली आहे. यावेळी नगरसेवक मनिष भिवगडे, विनय यादव, नगरसेविका गुंफाताई तिडके, पुष्पाताई कावडकर, रेखा टोहणे उपस्थित राहुन मागणी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले

Fri Jan 22 , 2021
कन्हान ला दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले #) पाच दुचाकीची चोरी, फक्त दोन दुचाकी चोर मिळाले, तीन दुचाकी चोर पकडण्यास अपयश कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पाच दुचाकी चोरी करण्यात आल्या यातील दोन दुचाकी चोरास गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर व कन्हान पोलीसांनी पकडले असुन अद्याप तीन दुचाकी चोरास पकडण्यास कन्हान पोलीसाना […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta