कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणच दुर्लक्षित का ? 

कोरोना मुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणच दुर्लक्षित का ? 

कन्हान : – कोविड-१९ महामारी भिती मुळे संपुर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम शैक्षणिक क्षेत्रातील संस्था बंद करून एक एक करित कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता एकएका देशात टाळे बंदी व संचारबंदी घोषित करून अति आवश्यक अन्न, आरोग्य व सुरक्षा सेवा वगळता संपुर्ण बंद करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना चांगली झळ बसुन परिस्थिती आटोक्यात येत असताना सरकारने शिथिलता करित एक एक करून सर्व व्यवस्था सुरू केल्या व करित आहे परंतु देशाचे उद्याचे भविष्य घड विणा-या शैक्षणिक शाळा, महाविद्यालये सुरू न करून विद्यार्थ्याचे शिक्षणच का दुर्लक्षित केल्या जात आहे. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

      कोवीड-१९ संसर्ग विषाणु आजाराचा चिन मधुन सुरूवात होऊन एक एक देश करित संपुर्ण देशात संसर्ग वाढुन भारतात कोरोना रूग्ण आढळुन संसर्ग वाढत असल्याने मार्च महिन्यात या संसर्ग रोगाचा भितीने शैक्षणिक परिक्षा, संस्थाचे कामकाज बंद करून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबविण्यात आले. तदनंतर एकाएक कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपुर्ण देशात टाळेबंदी व संचारबंदी लावण्यात आल्याने अति आवश्यक सेवा वगळता संपुर्ण व्यवसाय, सार्वजनिक सेवा, उद्योग, कामधंदे, बंद करण्यात आल्याने सर्वसा मान्याना चांगलीच झळ सहन करावी लागली. ग्रामिण भागातील दुस-या राज्यातील पोटभरण्याकरिता आलेल्या मजुर वर्ग मोठया संख्येने छोटया मुलाबाळासह उपाश्या पोटी पायदळ कितीतरी अंतर चालत असता ना मानुष्की जपणारे सेवक, सेवाभावी संस्थाच्या मदतीने आपल्या गावी पोहचले, तर कित्येकांचा रस्त्यात बळी गेला. या आपात्काळ परिस्थितीत किराणा दुकाने, भाजीपाला, दुध, दवाखाने, दवाई दुकान नियमाचे पालन करून सुरू ठेवण्यात आली.

नागरिकांना प्रशासनाची आरोग्य सेवा, सुरक्षा सेवा देणारी यंत्रणा कार्यान्वित होत्या. पुढे लॉकडाऊन मध्ये शिथिलता देत दारू दुकाना पासुन एक एक करित उद्योग धंदे, कामकाज सुरू करण्यात येत सार्वजनिक सेवा सुध्दा सुरू करण्यात येत आहे. परंतु देशाचे उज्वल भविष्य घडविणा-या शैक्षणिक शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचे कुणीही बोलत नसल्याचे दिसुन येत आहे. सरकार सुध्दा यावर मौन बाळगुन होते. जेव्हा की कोरोना आजार संसर्गाची लागन १ ते २५ वयोगटातील मुले, युवकात नग्ण असुन भावी उद्याच्या भविष्या करिता शैक्षणिक संस्था, शाळा व महाविद्यालये सुरू करून विद्यार्थ्याना शिक्षणा पासुन वंचित ठेवु नये. कारण अर्धे शैक्षणिक सत्र संपत आहे. कमीत कमी अर्ध्या सत्राचे नियोजन करून पहिले ९ ते १२ वी तरी शाळा, महाविद्यालय व शैक्षणिक संस्था सुरू करण्यात याव्या उज्वल भविष्य ही काळाची गरजेच्या लक्षाकडे सरकार, शासनाने गांभिर्याने विचार विनिमय करणे हे संविधानिक मुलभुत गरजेच्या पुरतेते करिता आवश्यक आहे. 

     ज्या शैकक्षणिक संस्थेत नियमाचे पालन करण्याची शिस्त लावुन उद्याचा उत्तम नागरिक घडविणा-या आहे. त्या संस्था वगळुन जेथे नियमाचे काटेकोर पण पालन न होणारे क्षेत्रात ढिल देण्यात येत असेल तर देशाचे व उद्याच्या भविष्य घडविणा-या शैक्षणिक संस्था टप्याटप्याने म्हणजे उच्च शिक्षण, इयत्ता ९ ते १२, इयत्ता ५ ते ८ व सर्व सुरळीत दिसल्यास इयत्ता १ ते ४ विद्यार्थ्याचे प्रत्यक्ष शिक्षण का सुरू करता याव्या. कमीत कमी इयत्ता १० व १२ वी विद्यार्थ्यां जिवनातील महत्वाचे पैलु असल्याने इयत्ता ९ ते १२ वी च्या शाळा, कनिष्ट महाविद्यालय सुरू करून अर्ध्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवुन पुर्ण होईल अश्या नियोजनपुर्ण परिक्षा पुढे ढकलुन घेतल्या तर सत्र २०२०-२१ चे अर्धे नुकसान होऊन पुढील सत्र २०२१-२२ चे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यास्तव दिवाळीनंतर लगेच तरी इयत्ता ९ ते १२ वी चे प्रायोगिक तत्वावर का होईना शिक्षण शहरी ग्रामिण या सर्व विद्यार्थ्याच्या भविष्याच्या दुष्टीने सुरू करण्याची कुजबुज पालक व विद्यार्थ्यात सुरू असुन शाळेतुन प्रत्यक्ष शिक्षण सुरू होण्याची आतुरतेने लक्ष लागले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

चि. स्मित यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Mon Nov 23 , 2020
            चि.स्मित सौ. कोमल महेश चकोले यास तिसर्‍या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा           शुभेच्छुक आजी -आजोबा ,आत्या,मामा,काका-काकु व समस्त चकोले व मेहर परिवारा तर्फे फार फार शुभेच्छा Post Views: 276

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta