राजमाता जिजाऊ चे पुस्तक भेट देत हळदी कूंकु कार्यक्रम‌‌ थाटात  जिजाऊ ब्रिगेड व्दारे राजमाता जिजाऊ, सावित्री फुले व स्वामी विवेकानंद जयंती साजरी 

राजमाता जिजाऊ चे पुस्तक भेट देत हळदी कूंकु कार्यक्रम थाटात

जिजाऊ ब्रिगेड व्दारे राजमाता जिजाऊ, सावित्री फुले व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

कन्हान,ता.२३ जानेवारी

    जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान व्दारे महिलांना राजमाता जिजाऊ चे पुस्तक सप्रेम भेट देऊन राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती हळदी-कूंकु कार्यक्रमाने थाटात पार पडला.

    राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेब, क्रांती ज्योती सावित्री फुले, स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्याने महिलांचा हळदी-कूंकु कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. सुनिताताई ईखार यांचे निवासस्थान संत तुकाराम नगर कन्हान येथे जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी शिवमती सुनंदाताई दिवटे, शिवमती छायाताई नाईक, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, दिप प्रज्वलित करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . प्रसंगी छायाताई नाईक, लताताई जळते व प्रिती कुकडे यांनी तिन्ही थोर महात्म्याच्या जिवनावर उत्तम मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ, सावित्री फुले व स्वामी विवेकानंद यांच्या समाजपयोगी कार्य आत्मसात व चिंतन करून सुसंस्कृत समाज घडविण्यास महिलांनी मौलाचे कार्य करावे. असे आवाहन, मा. मायाताई इंगोले यांनी आपल्या अध्यक्षिय मार्ग दर्शनातुन केले. उपस्थित महिलांना हळदी-कूंकु लावुन तिळगुळ व राजमाता जिजाऊ जिवन चरित्र पुस्तक महिलांना वाणात सप्रेम भेट म्हणुन देण्यात आले. अल्पोहार वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेड च्या शिवमती मिनाक्षी भोयर यांनी तर आभार प्रदर्शन शिवमती उज्वला लोखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता शिवमती रंजनाताई इंगोले, विद्या रहाटे, अनिता पांर्जुणे, मिनल मडके, किरण अनकर, पुष्पा बहलवार, अल्का कोल्हे, कमल गोतमारे, सपना इंगोले, शोभा अहिर, फुटाणे ताई, मायाताई भोयर, संगिता गि-हे, सुषमा बांते, पुष्पा चिखले, मोरे ताई, श्रीखंडे ताई, राजेश्वरी ताई, अर्चना कारेमोरे सह जिजाऊ ब्रिगेड शाखा कन्हान च्या महिला सदस्यानी बहु संख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Mon Jan 23 , 2023
नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन कन्हान,ता.२३ जानेवारी     नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सोमवार (दि.२३) जानेवारी रोजी नगर परिषद कन्हान-पिपरी कार्यालय येथे कार्यक्रम‌ पार पडला. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta