बळीराजाचे अवकाळी पावसाने गहु, धान पिकांचे नुकसान तहसिलदार व कृषी अधिका-याना शेतक-यांनी निवेदनातून मागणी

बळीराजाचे अवकाळी पावसाने गहु, धान पिकांचे नुकसान

तहसिलदार व कृषी अधिका-याना शेतक-यांनी निवेदनातून मागणी

कन्हान, ता.२९ फेब्रुवारी
     परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहु व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने शेत पिकांची मौका चौकसी करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासना कडे पाठवुन नुकसान ग्रस्त शेतक-याना आर्थिक सहायता मिळवुन द्यावी. अ़शी मागणी बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतक-यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.


    ग्राम पंचायत बोरडा (गणेशी) परिसरातील शेत शिवारात पंधरा दिवसा अगोदर अवकाळी पाऊस झाल्यामुळे हंगामी गहु व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱी पुन्हा आर्थिक संकटात सापडुन चिंतातुर झालेला आहे. बोरडा (गणेशी) परिसरातील शेतातील शेत पिकांची मौका चौकशी करून योग्य अहवाल शासनाकडे पाठवुन शेतक-याना नुकसान भरपाई म्हणुन शासनाचे आर्थिक साहय मिळवुन देण्यास सहकार्य करावे.

   अशी मागणी मंगळवार (दि.२७) ला ग्राम पंचायत बोरडा (गणेशी) उपसरपंच नरेंद्र ठाकरे यांच्या नेतुत्वात शिष्टमंडळाने तहसिलदार पारशिवनी व तालुका कृषी अधिकारी पं सं पारशिवनी यांना निवेदन देऊन केली आहे. शिष्टमंडळात ग्रां.प.बोरडा उपसरपंच नरेंद्र ठाकरे, दिनेश बंड, मंगेश अमृते, निरंजन बालकोटे, संजय मानवटकर, चंद्रशेखर डडूरे, राहुल नान्हुरे, अमित राऊत, धनराज गडे, मुकेश सोनवणे आदी प्रामुख्याने उपस्थित राहुन गावातील शेतकरी सुधाकर कुहिटे, कांतीलाल परसुडे, राहुल बालकोटे, श्रावण सोनवणे, रवींद बालकोटे, सुदाम डडुरे, ब्रम्हा डडुरे, परमेश्वर हारोडे, अनिल वाघमारे, श्रावण सोनवणे, हर्षल संतापे सह गावकरी शेतक-यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता ठिय्या आंदोलन  नारी शक्ती संघर्ष समितीचा पुढाकार

Thu Feb 29 , 2024
कन्हान शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता ठिय्या आंदोलन नारी शक्ती संघर्ष समितीचा पुढाकार कन्हान, ता.२९ फेब्रुवारी      मुली व महिलांची सुरक्षा, समाजकंटाका वर नियंत्रण आणि अवैद्य धंद्यावर आळा घालण्या करिता नारी शक्ती संघर्ष समिती व्दारे कन्हान, कांद्री शहरातील चौका-चौकात आणि टेकाडी बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्या करिता तारसा रोड […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta