कन्हान पोलिस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , करून पुढील तपास सुरू

कांन्द्री ला दोन युवकांना दोन आरोपींनी केली मारहाण

#) कन्हान पोलीस ठाण्यात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. 

 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री धन्यवाद गेट जवळ गाडीला कट मारल्याचा कारणावरुन दोन आरोपींनी बस चालक ला मारहाण करून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करित पुढील तपास सुरू केला आहे.

        प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.८) जुलै २०२१ ला सायंकाळी ५:३० ते ५:४५ वाजता दरम्यान बस क्र. युपी ७३ अ ७९२२ चा चालक आफताब मोहम्मद नफिस वय ३३ वर्ष राह. वलनी खापरखेड़ा व त्याचे मित्रासह खापरखेडा वरून मनसर ला जात असतांना कांन्द्री येथील धन्यवाद गेट जवळ आरोपी १) अंकित त्रिपाठी २) परजित सिंग दोन्ही राह. कन्हान यांनी बस समोर मोटार सायकल आडवी लावुन गाडीत प्रवेश करून ” तु गाडीला कट का मारली” असे म्हणून फिर्यादी बस चालक व त्याच्या मित्रास हातबुक्यानी मारहाण जख्मी केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध अप क्र. २५२/२१ कलम ३४१,३२३,३४ भांदवि गुन्हा नोंद करण्यात आला असु न गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोहवा नरेश वरकडे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहर विकास मंच कार्यकारणी चा विस्तार

Fri Jul 9 , 2021
कन्हान शहर विकास मंच कार्यकारणी चा विस्तार #) कार्याध्यक्ष , उपाध्यक्ष, महासचिव पद घोषित.  कन्हान : –  शहरात गेल्या दोन ते तीन वर्षा पासुन सात त्याने शहरातील विविध विषय प्रशासना समोर ठेवणा-या व सामाजिक कार्यक्रम नियमितपणे करणा-या कन्हान शहर विकास मंच मध्ये फेरबदल करून मंच अध्यक्ष यांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहमतीने कार्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta