भीमजयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व जयंती समिती व्दारे थाटात

भीमजयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व जयंती समिती व्दारे थाटात

कन्हान : – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती महोत्सव बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कन्हा न यांच्या सयुक्त विद्यमाने भीमगीत, केक व फटाक्यां ची आतिष बाजी, माल्यार्पण, भव्य रोग निदान शिबीर, भोजनदान आणि भव्य महारैली काढुन डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची चार दिवसीय जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

           दि.१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बुद्धीष्ट वेलफेअर सोसायटी कन्हान व्दारे मागि ल ३९-४० वर्षांपासुन भीम क्रांतिकारी चळवळीच्या माध्यमातुन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने डॉ.बाबा साहेब आंबेडकर चौक येथे साजरी करित आहे. या वर्षी डॉ बाबासाहेब आबेंडकर यांची १३२ व्या जयंती निमित्य चार दिवसीय भीम जयंती महोत्सव बुधवार (दि.१२) एप्रिल २०२३ ला नरेश चिमणकर प्रस्तुत ” भीम गीतांच्या ” कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आला.

गुरूवार (दि.१३) एप्रिल २०२३ ला रात्री १२ वाजता सिद्धार्थ कॉलोनी, गणेश नगर बुद्ध विहार व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिमे सामोर १३२ व्या वाढदिवसी केक कापुन फटाक्याची आतिशबाजी करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवार (दि.१४) एप्रिल २०२३ ला बुद्ध विहार सिद्धार्थ कॉलो नी येथे सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती व्दारे डॉ. बाबासाहेबा च्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.

सकाळी ११ वाजता डॉ. सुमेध रामटेके डी एन बी कार्डीयालॉजी, डॉ.पूजा मानवटकर त्वचा, गुप्तरोग व कुष्टरोग यांच्या मार्गदर्शनात ” भव्य रोग निदान शिबीर ” घेण्यात आले. यात २०० वर लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. सायंकाळी नागरिकांना भव्य भोजनदान करण्यात आले. शनिवार (दि.१५) एप्रिल २०२३ ला सायंकाळी पंचशील नगर सत्रापुर येथुन भव्य महारैली काढुन राष्ट्रीय महामार्गाने गांधी चौक, डॉ बाबासाहेब आबेंडकर चौक येथे माल्यार्पण व केक कापुन पुढे तारसा रोड चौक, नाका नंबर ७ पासुन परत बुद्ध विहा र सिद्धार्थ कॉलोनी गणेश नगर कन्हान येथे रैली चे समापन करण्यात आले.

चार दिवसीय डॉ आबेंडकर जयंती महोत्सवाच्या यशस्विते करिता बुद्धिस्ट वेल फेअर सोसायटी अध्यक्ष मा. भगवान नितनवरे, सर चिटणीस विनायक वाघधरे, मा. दौलत ढोके तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कन्हान चे पदाधिकारी आयु. स्वप्नील वाघधारे, कोषाध्यक्ष रजनीश (बाळा) मेश्राम, सुशील कळमकर, सागर उके , संयोजक निखिल भाऊ चवरे, अशोक नारनवरे, नरेश चिमणकर, मार्गदर्शक राजेंद्र फुलझेले, मोंटू राऊत, हिमाशु वासे, नितेश मेश्राम, राजेश सोमकुवर, अक्षय मोटघरे, निशांत मोटघरे, आनंद चव्हाण, मनोज गोंडाने , रॉबिन निकोसे, सोनु खोब्रागडे, आदित्य टेर्भुणे, जितु टेर्भुणे, मनोज गोंडाणे, सिद्धु ढोके, दिनेश नारनवरे, डॉ. विनय बागडे, चंद्रमणी पाटील, सुभाष लुंढुरे, सतिश ढबाले आदी सह सर्व समाज बांधवानी सहकार्य करून डॉ बाबासाहेब आबेंडकर जयंती महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

 रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने स्वाभिमानी भीम महोत्सव थाटात 

Mon Apr 17 , 2023
रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने स्वाभिमानी भीम महोत्सव थाटात कन्हान,ता.१५ एप्रिल   विश्वरत्न ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हानच्या वतीने दोन दिवसीय स्वाभिमानी भीम महोत्सवाचे थाटात आयोजन करण्यात आले. प्रबोधनकार भगवान गावंडे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार (१३ एप्रिल) रोजी करण्यात आले होते. विविध क्षेत्रात अतिविशेष […]

You May Like

Archives

Categories

Meta