उमरेड येथे सर्व स्तरिय कलाकार मेळावा संपन्न शा.राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत 

उमरेड येथे सर्व स्तरिय कलाकार मेळावा संपन्न

शा.राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत

उमरेड,ता.२३ ऑगस्ट

    एकता बहुउद्देशिय मंडळ उटी (चांपा) वतीने लोककला सांस्कृतिक राष्ट्रीय संगीत परिषद तालुका समिती, उमरेड साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती निमित्य एक दिवसीय सर्व स्तरिय कलाकार मेळावा नुकतेच विठोबा सभागृह, गिरड रोड, उमरेड येथे आयोजीत कार्यक्रम यशस्वीपणे थाटात पार पडला.

   यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उमरेड विधानसभा आमदार राजू पारवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पांरपारिक पद्धतीने सुरूवात करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार सुधीर पारवे, सचिव काँग्रेस कमेठी महाराष्ट्र संजय मेश्राम, राजेंद्र भीमराव बावनकुळे अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया, मानधन समिती सदस्य, सुबोध कान्हेकर माजी अध्यक्ष अनुदान समिती मुंबई आदी उपस्थित होते. मानधन समिती सदस्य शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे विदर्भ महाराष्ट्रात फिरून कला जतन करून ठेवणारे कलाकर यांना मंच उपलब्ध करून देणे, सर्व स्तरावरील शाहीर कलाकार यांना एकत्र आणून त्यांचा हक्कासाठी मोर्चे काढणे, सरकार दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असल्याने मेळाव्यात सहभागी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे आयोजन शाहीर मुकेश दुधकवर, शा.प्रवीण आदे, शा.गोपीचंद गोखले यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज नवघरे यांनी केले. यावेळी शाहीर भगवान लांजेवार, शाहीर अरुण मेश्राम, शाहीर प्रदीप कडबे,वंदना घूमडे ,प्रमुख मंडळी व जिल्हास्तरीय समस्त कलाकार बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शा.प्रदिप कडबे यांनी गायनाचा माध्यमातून समाज प्रबोधन

Thu Aug 24 , 2023
 शा.प्रदिप कडबे यांनी गायनाचा माध्यमातून समाज प्रबोधन रामटेक :- मनसर येथे रामधाम श्रावण महिण्याचा पहिल्या सोमवार (दि.२१) रोजी सकाळी दहा वाजता विधीवत पुजा अर्चना करून रामटेक विधानसभा क्षेत्रातील जनतेचा सुख व समृद्धीसाठी रामधाम येथील बार्फानी बाबा अमरनाथचे कपाट उघडले होते.       प्रसंगी भिम शाहीर प्रदिप बागवान कडबे यांनी […]

You May Like

Archives

Categories

Meta