संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी

संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी

कन्हान,ता.२२ डिसेंबर.

   कांद्री येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३२३ वी पुण्यतिथि साजरी करण्यात आली .

   कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नवनियुक्त तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष मा.योगेश वाडीभस्मे यांच्या हस्ते श्री‌ संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच बलवंत पडोळे, माजी सदस्य शिवाजी चकोले, जेष्ठ नागरिक कवडुजी आकरे, हेमराजजी आंबाळकर आदि ने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत पुण्यतिथि साजरी करण्यात आली.

   प्रसंगी श्यामराव चकोले, वासुदेव आकरे, जिभल सरोदे, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, रोहित चकोले, कवडुजी बारई, शंकर सरोदे, सुनीता हिवरकर, उषा वंजारी, पारस देशमुख, श्याम मस्के, मनोज भोले, लोकेश वैद्य, सह आदि नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात  दिडशे च्या वर लोकांनी साखळी उपोषणाला भेट 

Fri Dec 23 , 2022
    माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात दिडशे च्या वर लोकांनी साखळी उपोषणाला भेट कन्हान ता.२२ डिसेंबर      हिंदुस्थान लीवर लीमिटेड ची संपूर्ण १८.७८ एकर भुंखड ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारा खरेदी करण्यात आलेली.  शहराचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मिळावा, त्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा या […]

You May Like

Archives

Categories

Meta