कन्हान, साटक ला ८५ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ 

कन्हान, साटक ला ८५ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लस चा लाभ   

#) प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान ७४ व साटक ११ अश्या ८५ लसीकरण. 


कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ६० वर्षा वरील जेष्ट व दुर्धर आजाराच्या व्यक्तीना कोरोना लस ७४ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे ११ अश्या ८५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावुन लाभ देण्यात आला. (दि.५) मार्च पासुन आतापर्यंत कन्हान, साटक या केंद्रा व्दारे कन्हान परिसरात एकुण २५८६ लसीकरण करण्यात आले आहे. 

       शासनाने (दि.५) मार्च पासुन ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिक व ४५ वर्षा वरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोरोना विषाणु पासुन बचाव करण्याकरिता प्रतिबंधक लस लावणे सुरू केले असुन बुधवार (दि.३१) मार्च ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ७४, व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ला ११ असे ८५ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लावण्यात ़आली. आता पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १६१५, वेकोलि जे. एन दवाखाना कांद्री २०४ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ७६७ असे (दि.५) मार्च पासुन आता पर्यंत कन्हान परिसरात एकुण २५८६ लसीकरण करण्यात आले आहे.

याकरिता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कोरोना विभाग तालुका प्रमुख डॉ अन्सारी यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे डॉ योगेंद्र चौधरी व प्राथमिक आरोग्य केंद्र साटकच्या डॉ वैशाली हिंगे सह सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत. दिवसेदिवस कन्हान परिसर व नागपुर जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कुठल्याही खोटया प्रचाराला बळी न पडता कोरोना लस लावुन घेणे आवश्यक असुन नागरिकांनी कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक शासनाच्या नियमाचे  काटेकोरपणे पालन करून आपली व कुंटुबाची काळजी घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व साटक व्दारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान रहिवासी श्री राजेश खौरे यांचे दु:खद निधन

Wed Mar 31 , 2021
– :  निधन वार्ता  : – श्री राजेश खौरे यांचे दु:खद निधन कन्हान : – साईबाबा आश्रम शाळा टेकाडी चे मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री राजेश पुंडलिकरावजी खौरे रा. गणेश नगर कन्हान ता पारशिवनी जि नागपुर यांचे बुधवार (दि.३१) मार्च ला सकाळी ११ वाजता कामठी येथील खाजगी रूग्णालयात कोरोना आजारा च्या उपचारा दरम्यान […]

You May Like

Archives

Categories

Meta