न पचणाऱ्यांना जास्त दिलं म्हणुन पचलं नाही – किशोरीताई पेडणेकर कन्हान शहरा मधून स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ

न पचणाऱ्यांना जास्त दिलं म्हणुन पचलं नाही – किशोरीताई पेडणेकर

कन्हान शहरा मधून स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ

कन्हान, ता.१७ जानेवारी

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर या स्त्री शक्ती संवाद यात्रा निमित्त विदर्भ दौऱ्यावर असतांना रामटेक विधानसभेचे प्रवेश व्दार कन्हान येथुन स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

     बुधवार (दि.१७) जानेवारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनसंपर्क कार्यलय तारसा रोड, कन्हान येथे पक्षाच्या उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर स्त्री शक्ती संवाद यात्रा निमित्त विदर्भ दौऱ्यावर आहे. रामटेक विधानसभेचे प्रवेश व्दार कन्हान येथुन स्त्री शक्ती संवाद यात्रेचा शुभारंभ महिला पदाधिकारी व महिला शिवसैनिकांच्या उपस्थित करण्यात आला.

     प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ. रंजना ताई नेवाळकर, पूर्व विदर्भ महिला संघटिका शिल्पा ताई बोडके, रामटेक लोकसभा महिला संपर्क प्रमुख मंदाकिनीताई भावे, जिल्हा प्रमुख वंदनाताई लोणकर, माजी जिल्हा प्रमुख अल्काताई दलाल, रामटेक विधान सभा प्रमुख विशाल बरबटे, लोकसभा सहसंपर्क प्रमुख उत्तम कापसे, तालुका प्रमुख कैलास खंडार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

     यावेळी पेडणेकर ताई यांनी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या की, आदरणीय बाळासाहेबांनी व उद्धवसाहेबांनी सोडुन गेलेल्यांना भरभरून दिलं, विश्वास केला, खाली बसत असलेल्याना खुर्चीवर बसवले. आपलं समजुन तोंड भरवले पण काहींना जास्त दिल्यामुळे पचलं नाही. परंतु सच्चा शिवसैनिक आजही आपल्या सोबत मोठया संख्येने आहे. पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीत शिवसेना काय आहे ? ते सर्व दाखवुन देतील. यावेळी उपस्थित सर्व महिला भगिनींना मकरसंक्राती च्या शुभेच्छा देऊन उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीर तेने उभे राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता रामटेक विधानसभा क्षेत्रातील विधानसभा संघटिका दुर्गाताई कोचे, रामटेक तालुका महिला प्रमुख कलाताई तिवारी, तालुका संघटिका प्रमिला लोखंडे, नगरसेविका मोनिकाताई पौनिकर, मनसर माजी सरपंच योगीश्वरी चोखांद्रे, मोकरकर ताई, वैशालीताई खंडार, ललिता शर्मा, माया नामदिवे, उषा साखोरे, पुष्पा कारेमोरे, माजी ग्रा.प.सदस्य संगीता पंधराम, रजनी परसमोळे, शिल्पा मडावी सह बहु संख्य महिला शिवसैनिकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मकर संक्रांती निमित्य दुय्यम, खडी गम्मती व्दारे मनोरंजन

Wed Jan 17 , 2024
मकर संक्रांती निमित्य दुय्यम, खडी गम्मती व्दारे मनोरंजन कन्हान, ता.१७ जानेवारी      नववर्ष व मकर संक्रांती निमित्ताने दुय्यम, खडी गम्मत, तमाशाचा कार्यक्रम कांद्री येथिल वार्ड क्रं.दोन च्या नागरिकां व्दारे आयोजित करून ग्रामस्थ नागरिकांचे मनोरंजनात्मक प्रबोधन करण्यात आले.      नववर्ष व मकर संक्रांतीचे औचित्य साधुन श्री दंत मंदीर कांद्री […]

You May Like

Archives

Categories

Meta