नागनदीच्या दुषित पाण्याने कन्हान नदी झाली गटारगंगा

नागनदीच्या दुषित पाण्याने कन्हान नदी झाली गटारगंगा

#) कन्हान, नागनदी संगमाने सावंगी (चापेगडी) परिसर प्रदुषणाच्या विळखळयात. 

#) जिवनदाहीनी कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदीचे संवर्धन व संगोपन करा. 


कन्हान : –  नागपुर शहराचे मलमुत्र, घाण वाहणरी नागनदी कुही तालुक्यातील सावंगी (चापेगडी) येथे कन्हान नदीला मिळणा-या संगमा पासुन प्रचंड प्रदुषित हो़ऊन परिसरातील नागरिक, शेतकरी, भोई समाज आदीना जिवन जगण्यास भयंकर त्रास सहन करावा लागत असुन दुर्धर आजाराला बळी पडुन जिवीतास धोका निर्माण झाल्याने नागनदीने शहराची घाण सोडणा-या महानगरपालिका अधिका-यावर संबंधित विभाग कठोर कार्यवाई करेल का ? अशा प्रश्न ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव हयांनी उपस्थित केला आहे. 

         ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे “कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून नदीचे संवर्धन व संगोपन ” चळवळी अंत र्गत नागपुर जिल्हयाची जिवनदाहीनी कन्हान नदी ही नागपुर जिल्हा शहर व ग्रामिण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे नैसर्गिक प्रमुख स्त्रोत , साधन असुन सुध्दा सावनेर, खापा, खापरखेडा, कन्हान, कामठी, मौदा परिसरातील मोठया प्रमाणात नागरी सांडपाणी, घाण, कोबडे, बकरा मटन बाजार,  जनावरांचे कत्तलखान्यातील घाण नाल्या व्दारे नदी सोडली जाते, विज प्रकल्प, कोळसा खाणीतील दुषित पाणी कन्हान नदीत सरळ सोडुन नदीचे पाणी दुषित करण्यात येत आहे. तसेच नागपुर महानगर पालीका अंतर्गत संपुर्ण शहरवासीयांची घाण, साडपाणी, मेलेले कुत्रे, डुकरे, जनावरे, मलमुत्राचे भयंकर दुषित पाणी कुही तालुक्यातील सावंगी (चापेगडी) येथे मौदा कडुन येणा-या कन्हान नदी पात्रात नागनदीचा संगम होऊन कन्हान नदी गटारगंगा करून प्रचंड प्रदुषित केल्याने प्रदुषणाचा कळसच गाठला आहे. कन्हान – नागनदी  सावंगी संगम कोसो दुरच्या परिसरात दुर्गंधी पसरून हेच दुषित पाणी परिसरातील संपुर्ण गावाना फक्त ब्लि चींग टाकुन पिण्याकरिता पुरवठा केला जातो. हेच पाणी शेती करिता सुध्दा उपयोग केला जातो. जनावरे तर हेच दुषित पाणी पितात अश्या सर्व त-हेने नागरि कांच्या जिवन जगण्यात या दुर्षित पाण्याचा प्रादुर्भाव सतत होत लोकांना कॅंसर सारख्या दुर्धर आजाराला बळी पडावे लागत आहे. यास्तव सर्वसामान्य नागरि कांच्या जगण्यात नागनदी व्दारे विष कालविण्या-या नागपुर महानगर पालीका वरिष्ठ अधिका-यांवर महा राष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळ व संबंधित अधिकारी फौ जदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार का ? अशा प्रश्न ग्रामोन्नती प्रतिष्ठान चे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हयानी उपस्थित करून कन्हान नदीत दुर्षित पाणी सोडणे बंद करून नैसर्गिक पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, साधन कन्हान नदी प्रदुषण मुक्त करून मोठया प्रमाणात निधी खर्च करून नदीचे संवर्धन व संगोपन करण्याची अंत्यत महत्वाची काळा नुरूप गरज निर्माण झाल्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने केली आहे. याप्रसंगी मोतीराम रहाटे, दिलीप राईकवार, अशोक हिंगणकर, गणेश भोंगाडे, अजय ठाकरे, हरिष कडव, रवि नाईक, मनिष मते, गोविंद जुनघरे, प्रविण गोडे, ऋृषभ बावनकर, राकेश सपाटे, सचिन राऊत, मधुकर सपाटे, आंनद भोयर, राजेश गायधने, अंकुश सपाटे, नरेश वैद्य, सचिन राऊत, वामन सपाटे, अखाडु मांढरे सह नागरिक उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

खाजगी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, तिघे ठार : आठ प्रवासी जखमी , पाटणसावंगी येथील घटना

Fri Mar 19 , 2021
सावनेर , : भरधाव खासगी बसने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे . तसेच आठ प्रवासी जखमी झाले . ही घटना नागपूर सावनेर महामार्गावर पाटणसावंगी उड्डाणपुलावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली . जखमींना नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे . रॉयल महाराजा कंपनीची खासगी […]

You May Like

Archives

Categories

Meta