शैक्षणिक वर्षात बदल करण्यात यावा : राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे साकडे  

शैक्षणिक वर्षात बदल करण्यात यावा

#) पंतप्रधानांना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे साकडे

कन्हान : –  कोविड -१९ हया जागतिक महामारीमुळे अवघे विश्व संकटात आहे. या महामारीमुळे मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रात आमुलाग्र बदल दिसून येत आहेत. दरवर्षी माहे जुन मध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. ती या वर्षी देखील झाली पण देशातील सर्व शाळा, महाविदयालय, विद्यापीठ बंद आहेत. शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरु असले तरी देशाच्या तळागाळातील ग्रामीण भागातील सर्वच मुलांना हया ऑनलाइन शिक्षणाचा लाभ मिळताना दिसत नाही. या महामारीमुळे विद्यार्थ्याचे अर्धे शैक्षणिक सत्र जवळपास वाया गेले आहे. हे मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे. मुलाच्या सर्वंकष व्यक्तिमत्व विकासासाठी शाळा सुरु राहणे अत्यंत आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक नाही.

सतत च्या ऑनलाइन शिक्षणामुळे अनेक शारीरिक आजार उदभवत आहे. म्हणुन संपुर्ण भारत देशातील सर्व शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्यात यावे अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशात माहे जुन व जुलै मध्ये मोठ्या प्रमाणात शेतीच्या पेरणीची कामे होतात. याच काळात शाळा उघडतात परंतु ग्रामीण भागातील शाळां मध्ये उपस्थितिचे अतिशय अल्प प्रमाण असते कारण विद्यार्थी शेतात कामासाठी जातात. त्यामुळे या मुलांचे दरवर्षी मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होते. कोरोनामुळे आधीच विध्यार्थ्यांचे सहा महिने वाया गेले आहेत ही बाब विचारात घेवुन संपुर्ण भारतात जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष जाहीर करण्यात यावे व शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात होणारे शोषण व भेदभाव टाळण्यासाठी सी.बी. एस.ई., आय.सी.एस.ई., स्टेट बोर्ड असे वेगवेगळे अभ्यासक्रम रद्द करून एक देश , एक शैक्षणिक वर्ष व एकच अभ्यास क्रम राबविण्यात यावा अशी मागणी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

असे निवेदन पप्पु पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, महासचिव सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते, सतिष काळे, प्रा.शेषराव येलेकर, अंबादास रेडे, डाँ.विलास पाटील, राजकिरण चव्हाण, विनोद आगलावे, शामराव लवांडे, वसंत नेरकर, राजेंद्र भोयर, शालिक बोरसे,बंडु डाखरे,प्रल्हाद कर्हाळे, देवेंद्र टाले, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रेमचंद आहिरराव, आर.आर.वांडेकर, के.डी.वाघ, विठ्ठल घायाळ, अनंत मिटकरी, भास्कर शिंदे, पंजाब दांदले, संजय निंबाळकर, नंदा वाळके, सुरेंद्र बनसिंगे, पुष्पा कोंडलवार, हर्षा वाघमारे, संजीव शिंदे, राजेश मालापुरे, योगेश कडु, प्रवीण मेश्राम, गजानन कोंगरे, चेतना कांबळे, प्रिया मेश्राम, कीर्ती वनकर, स्वपींल ठाकरे, संगीता ठाकरे, चेतन चव्हाण, सुरज बमनोटे, अतुल बोबडे, अश्विन शम्बरकर, मेघराज गावखरे, भास्कर कढवणे, अनिल घोरपडे, वल्लभ गाढे, राजेश भोसले, बलवंत घोगरे, देविदास शिंदे, राजेंद्र चव्हाण, निलेश पाटील, बंडु गाडेकर, राजेश वैद्य,  कुंदन पाटील, रत्नाकर मुंगले, दिलीप गायकवाड, अशोक कुटे, अशोक ढोले, अनिल खेमडे, आनंद पिंगळे, हरिभाऊ लोखडे, भालचंद्र कोकाटे, विनोद आगलावे, रमेश पाटील, मनोजकुमार रणदिवे, निलेश पाटील, आनिल बोधे, डी.के.देसाई, गणेश उढाण, विजय कर्हाळे, मधुकर मोरे, किरण पाटील, शंकर काळे, आनिल भुसारी, राजकुमार शिंगनजुडे, सुरेश दास, बी. एन.पवार, अजित कणसे, सुनिल चौधरी, अजित वाकसे, सुरेंद्र बालशिंगे, शिवशंकर स्वामी, नितीन पवार, संगिता निंबाळकर, परमेश्वर वाघ, सुनिल मनवर, भारत पाटील, रमेश पाटेकर, प्रविण पंडीत, शिवाजी मुळे, बाळासाहेब यादव, प्रविण ठोंबरे, विनोद डाखोरे, संजय आम्बरे, राम गायकवाड आदीने केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

६ वर्षिय बालिके वर लौगिंक अत्याचार करणारे ,आरोपीस अटक :उपनिरिक्षक भुते यांची माहिती

Tue Sep 8 , 2020
६ वर्षिय बालिके वर लैगिंक अत्याचार करणारे ,आरोपिस अटक , पोलिस उपनिरिक्षक भुते यांची माहिती* कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी पाराशिवनी (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील गाव गुंदरी (वांढे) येथे सहा सप्टेंबर रविवारी दुपारी तीन वाजता एका सहा वर्षे बालिकेवर लैगीक अत्याचार करण्याच्या प्रकार घडला,पाराशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील हा प्रकार असून आरोपी […]

You May Like

Archives

Categories

Meta