कामठी खुली कोळसा खदान पोकलँड मशीन मधुन डिझेल चोरी

कामठी खुली कोळसा खदान पोकलँड मशीन मधुन डिझेल चोरी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथील पोकलँड मशीन च्या डिझेल टाकीचे झाकन उघडुन अज्ञात चोराने डिझेल चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

       सोमवार (दि.१७) ला सकाळी ८.३० वाजता दरम्यान वेकोलि कामठी खुली कोळसा खदान चे सुरक्षा रक्षक जंगलु बडोद्रो हे पेट्रोलिंग करित असताना टाटा कंपनीची पोकलँड मशीनच्या डिझेल टाकीचे झाकन उघडुन अज्ञात चोरोने ३० ते ३५ लिटर डिझेल किंमत २८०० रूपयांचे चोरून नेल्याचे दिसुन आल्याने फिर्यादी जंगलु गंगाराम बडोद्रो वय ५९ वर्ष रा. शिवाजी नगर कन्हान वेकोलि सुरक्षा हयानी वरिष्ट अधिका-यांना डिझेल चोरी ची माहीती देऊन कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात इसमा विरूध्द कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोहवा. अरूणकुमार सहारे करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर येथे बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे कोविड सेंटर चे मंत्री केदार यांच्या हस्ते उद्घाटन

Wed May 19 , 2021
सावनेर : स्थानिक भालेराव हायस्कुल सामोरील बालाजी सेलिब्रेशन लॉन येथे श्री.गुरूकृपा हॉस्पिटल व डेडीकेटेड कोविंड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पशु संर्वधन , दुग्ध विकास , क्रिडा व युवक कल्याण मंत्री मा . सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले . यावेळी मंत्री केदार यांनी डॉक्टर व त्यांच्या चमुचे कौतुक करीत स्वतःचा जिव […]

You May Like

Archives

Categories

Meta