कन्हान च्या संजीवनी कोव्हिड सेंटर ला तहसीलदार सहारे यांची भेट    

कन्हान च्या संजीवनी कोव्हिड सेंटर ला तहसीलदार सहारे यांची भेट  

#) कोव्हिड केअर सेंटरला त्वरित इतर व्यवस्था उपलब्ध करू – तहसीलदार वरुणकुमार सहारे. 

कन्हान : –  शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांची कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याची माग णी असल्याने (दि.१७) मे ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ होऊन आठ दिवसांनी पारशिवनी तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी भेट देऊन संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिका-यांशी चर्चा करून त्वरित इतर सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. 

         कन्हान शहर व परिसरात कोरोनाच्या उपचारार्थ गोरगरिबांना चांगलाच त्रास सहन करावा लागला असुन कित्येक लोकांना योग्य उपचार न मिळाल्याने आणि कन्हान पासुन नागपुर चे अंतर लांब असल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्या अगोदर कित्येक लोकांचा मृत्यु झाला. कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात करण्याकरिता शहातल्या काही सामाजिक कार्यकत्यासह संजीवनी कोव्हिड केअर सेंटरचे संचालक सौ.शीतल मुकेश चौधरी व तुषार फडणवीस यांच्या प्रयत्नाने सोमवार (दि.१७) मे २०२१ ला दुपारी १२ वाजता नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील विजय मॉर्केट येथील डोणेकर सभागृह येथे संजीवनी कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ करण्यात आला असुन आता पर्यंत पाच रुग्ण बरे झाले असल्याने मंगळवार दि.२५  मे २०२१ ला दुपारी २:०० वाजता तहसीलदार वरुण कुमार सहारे यांनी संजीवनी कोव्हिड केअर सेंटर ला भेट देऊन संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन संचाल क सौ.शीतल मुकेश चौधरी व तुषार फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हानचे डॉ योगेश चौधरी यांच्या सहकार्याने कोरोना चाचण्या, रुग्णांची भर्ती, बेड्स, ऑक्सीजन व कोव्हिड केअर सेंटर ला लागणारे इतर सुविधा, व्यवस्था संबंधित अधिका-यार्शी चर्चा करून त्वरित उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन तहसीलदार वरुणकुमार सहारे यांनी दिले. याप्रसंगी मंडळ अधिकारी व कोव्हिड केअर सेंटर चे डॉक्टर, नर्स व सहकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी

Thu May 27 , 2021
*कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी* कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नाका नंबर सात सुजाता बुद्ध बिहार येथे करुन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व बुद्ध वंदना करुन बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात […]

You May Like

Archives

Categories

Meta