नगरपरिषद व पोलीस प्रशासना व्दारे नियमाचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई

नगरपरिषद व पोलीस प्रशासना व्दारे नियमाचे उल्लंघन करणा-यावर दंडात्मक कारवाई. 

#) सोशल डिस्टेसिंग, मास्क न वापरणा-या कडुन ३ लाख १७ हजार ५०० रूपयांचा दंड वसुल. 

कन्हान : – शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमा वली कडक केली असुन जिल्हाधिकारी रविंन्द्र ठाकरे यांचा आदेशानुसार कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रात दि.१५ मे २०२१ च्या कालावधी पर्यंत कन्हान शहर परिसरात कडक नियमावली आदेश लागु असुन आता पर्यंत शहरात शासनाच्या नियमाचे उल्लंघन म्हणजे सोशल डिस्टेसिंग, मास्कचा वापर न करणा-या कडुन  नगरपरिषद कन्हान व पोलीस प्रशासनाने एकुण ३ लाख १७ हजार पाचशे रुपयांचा दंड वसुल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

       महाराष्ट्र राज्यात, नागपुर जिल्हा व कन्हान शहर परिसरात कोरोना चा वाढत्या पार्श्वभुमीवर राज्य शास ना द्वारे कडक नियमावली सह संचारबंदी लागु करण्या त आल्याने सध्याच्या परिस्थितीत राज्यात कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरपरिषद क्षेत्रात १५ मे २०२१ या कालावधीत राज्य शासनाने वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वस्तु वगळुन बाकी सर्व कडक नियमावली करण्यात आली आहे. कन्हान शहर परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कन्हान-पिपरी नग रपरिषद क्षेत्रात १५ मे २०२१ या कालावधी पर्यंत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी सर्व प्रकारचे खाद्यान्ने यात चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडीची दुकानें, शेती उत्पादना संबंधित दुकाने, प्राण्याचे अन्नपदार्थ विकणारी दुकानें, पावसा ळी साहित्य विकणारी दुकानें यांना सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले असुन या दरम्या न सर्व दुकानांमधुन होम डिलेव्हरी मात्र सकाळी ७ ते रात्री ८ वाजे पर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कन्हान शहर परिसरात शासनाच्या नियमाचे उल्लंघन होत असल्यामुळे नगरपरिषद कन्हान व पोलीस प्रशासनाने मास्क चा वापर न करणा-यावर २,००,००० रुपयांचा दंड व सोशल डिस्टेसिंगचे पालन न करण्या-यावर १,१७,५०० रुपयांचा दंड असा एकुण ३,१७,५०० रुपयांचा दंड एप्रिल २०२० पासुन आता पर्यंत वसुल करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती कन्हान-पिपरी नगरपरिषद कार्या लय अधिक्षक सुशांत नरहरी यांनी दिली आहे. 

      राज्य शासनाच्या नवीन कडक नियमावलीचे काटे कोरपणे पालन न करणा-या व्यापारी, दुकानदार, नाग रिकांवर व आस्थापने वर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ व ५६ आणि भारतीय दंड संहिता चे कलम १८८ अंतर्गत आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येणार असुन कोणी ही विनाकारण घरा बाहे र पडु नये, गर्दीत जाणे टाळावे अन्यथा दंडात्मक कार वाई करण्यात येईल असे आवाहन नगरपरिषद कन्हान व पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलीसांनी कांद्री ला धाड मारून जुगार पकडला : मोठी कारवाई

Tue May 11 , 2021
कन्हान पोलीसांनी कांद्री ला धाड मारून जुगार पकडला.  #) दहा आरोपीना पकडुन ३,७५, ३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून सापळा रचुन हरिहर नगर कांद्री येथे धाड मारून जुगार खेळताना दहा आरोपीना पकडुन त्याच्या ताब्यातील ५२ पत्ते, ३ दुचाकी, ४ मोबाईल, डावावरील नगदी ३५३६० रू […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta