विविध ठिकाणी घरफोडी करणारे टोळीस 1,83,544/-रुपये किमतीचा मुद्देमालसह आरोपीना अटक

*विविध ठिकाणी घरफोडी करणारे टोळीस चोरीचे मुद्देमालसह जेरबंध

*1,83,544/-रुपये किमतीचा मुद्देमालसह आरोपीना अटक

 


कन्हान :  नागपुर ग्रामीण हद्ददीमध्ये वाढत्या चोरीच्या घटनावर आळा घालण्याकरीता राकेश ओला पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार यांना घरफोडी करणारे चोरांचा शोध घेवुन त्यांना जेरबंध करण्याचे आदेश दिले .त्याप्रमाणे अनिल जिट्टावार यांनी पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यात आला .
11 डीसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे मौदा पोलीस ठाणेचे हददी मध्ये गस्त करीत असतांना गोपनीय माहीती मार्फत एक तरूण उर्फ तुफान अशोक मेश्राम वय 18 रा. रेल्वे क्राॅसींग कन्हान रोड कामठी यास ताब्यात घेऊन त्यास पोलिस खाक्यादाखवत विचारपूस केली असता त्याने इतर साथीदार विक्रांत उर्फ गोलू विजय मेश्राम वय 24 रा.सैलाब नगर कामठी , विक्की उर्फ ईडो राजु बोरकर वय 22, कामठी, मोहब्बद मोईन बकरे आलम नगर कामठी यांनी मौदा,कळमेश्वर, कन्हान, पारशीवनी, अरोली हददीत विविध घरफोडी केली असल्याची कबुली दिली.


प्राप्त माहीतीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तात्काळ इतर आरोपीना देखील कामठी येथील विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले त्या सर्वाना सखोल चौंकशी केली असता मौदा पोलीस ठाणेचे हददीतील गुमथळा, भंडारा रोड, कळमेश्वर पोलिस ठाणेतील काटोल रोडवर, अरोली हददीत निमखेडा येथे धान्य व्यापाराच्या दुकानात तसेच पारशीवनी येथील कुंभार मोहल्ला व कन्हान येथे दिवसाची व रात्रीचे वेळेस घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले .त्यांचा कडुन घटनांमध्ये मुद्देमाल जप्त केले यात 25 ग्रॅम वजनाचे, किंमत 1,20,000/- रूपये,रियलमी कंपनीचा मोबाईल फोन कीमत 12000/-रुपये, 192 ग्रॅम वजनाचे चांदीचे पायल किंमत 8544/- रुपये, एक 32इंची सलोरा कंपनीचा एलसीडी टिव्ही किंमत 20,000/- रुपये, एक 32 इंची फिलिप्स कंपनीचा एलसीडी टिव्ही किंमत 23000/- रुपये अशा आरोपीतांकडुन एकूण सहा घरफोडी गुन्हे उघडकीस आणून त्यांचे कडुन एकूण 1,83,544/-रुपये किमतीचा मुद्देमालसह जप्त करण्यात आला आहे .सदर प्रशंसनीय कामगीरी राकेश ओला पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण, राहुल माकणीकर, अपर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली अनिल जिट्टावार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांचे आदेशाने सपोनि जितेन्द्र वैरागडे, पोउपनि सचिन मते,पोउपनि नरेन्द्र गौरखेडे, सफी लक्ष्मीप्रसाद दुबे ,हेक्टेयर विनोद काळे, हेकाॅ नाना राऊत ,नापोशी शैलेश यादव,अरविंद भगत, सत्याशिल कोठारे, वीरेन्द्र नरड, प्रणय बनारकर, विपीन गायधने, महेश बीसने, अजीज दूधकनोज व चालक सफौ साहेबराव बहाळे यांचे पथकाने केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खापा येथे केककापून साजरा

Sun Dec 13 , 2020
खापा  : शहर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला,अल्पसंख्याक, मीडिया, विधार्थी सेलच्या वतीने राष्ट्रवादी परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस खापा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे साजरा करण्यात आला. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खापा नगर परिषदचे माजी नगर सेवक श्री अशोकजी बारापात्रे, मासुरकर गुरूजी,शंकरजी गोखे,खेमाजी डेकाटे यांच्या हस्ते […]

You May Like

Archives

Categories

Meta