कन्हान परिसर १००% शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोना चाचणी

कन्हान परिसर १००% शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांची कोरोना चाचणी. 

#) कन्हान २ साटक १ शिक्षक असे ३ शिक्षक व कन्हानचा एक शिक्षकेत्तर कर्मचारी पॉझीटिव्ह. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : – इयत्ता ९ ते १२ वी च्या शाळा सुरू करण्या करिता जिल्हा प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र क न्हान व साटक या दोन केंद्रात परिसरातील १५ शाळा व ७ कनिष्ट महाविद्यालयातील २३३ शिक्षक, शिक्षके त्तर कर्मचा-यांची आरटीपीसीआर तपासणी करून  कन्हान परिसर १००% शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यां  ची मोफत कोरोना चाचणी करण्यात आली. यात ३ शिक्षक व १ शिक्षकेत्तर कर्मचारी असे ४ अहवाल पॉझीटिव्ह आले. 

          कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होत असल्याने  महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान व भवित्व्याच्या दुष्टीने शाळा सुरू करण्याच्या पालकां ची मागणी लक्षात घेत प्रायोगिक तत्वावर इयता ९ ते १२ वी चे प्रत्यक्ष शिक्षण सोमवार (दि.२३) नोव्हेंबर पासुन प्रतिबंधक उपाय योजनाच्या नियमाचे पालन करून शाळा सुरू करण्याकरिता संबधित विभागाच्या अधिका-यांना निर्देश दिल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हानचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी व साटक च्या डॉ वैशाली हिंगे हयांनी दोन केद्रात गुरूवा र (दि.१९) व शुक्रवार (दि.२०) ला कन्हान परिसरातील साटक केंद्रातील ३ व कन्हान १२ अश्या १५ शाळा आणि ७ कनिष्ट महाविद्यालयातील १५६ शिक्षक ७७ शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकुण २३३ शिक्षक,  शिक्ष केत्तर कर्मचा-यांची रॅपेट व आरटीपीसीआर मोफत तपासणी करून कन्हान परिसरातील १००% कोरोना चाचणी करण्यात आली. यात कन्हान २ शिक्षिका, साटक १ शिक्षक असे ३ शिक्षक व कन्हान चा एक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. अशी माहीती डॉ योगेश चौधरी व डॉ वैशाली हिंगे हयानी भ्रमणध्वनी  (फोन) वरून सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

मेकअप प्रतियोगिता मध्ये कु .कल्याणी सरोदे देशात प्रथम

Mon Nov 23 , 2020
*मेकअप प्रतियोगिता मध्ये कु .कल्याणी सरोदे देशात प्रथम* #) कन्हान शहर विकास मंच ने केले सत्कार कन्हान – नागपुर शहरात एका नामांकित ज्वेर्लस च्या वतीने मेकअप प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आले असुन या मेकअप प्रतियोगिता मध्ये कांन्द्री ची कु . कल्याणी सरोदे देशात प्रथम आल्याने कन्हान शहर विकास मंच च्या […]

You May Like

Archives

Categories

Meta