नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी घेतला लाभ.   

नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी घेतला लाभ. 

कन्हान : – रेल्वे स्टेशन रोड कन्हान स्थित मल्टीस्पेलीटी क्लीनीक येथे राजे ग्रुप कन्हान व सामाजिक संस्था व्दारे आयोजित नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी उपचार व मौफत औषधाचा लाभ घेतला. 

       रविवार (दि.८) ला मल्टीस्पेलिटी क्लीनीक रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथे राजे ग्रुप कन्हान व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने नि:शुल्क आरोग्य शिबीराचे  आयोजन करण्यात आले. यात आशा दवाखाना कामठीचे फिजिशियन डॉ. वासिम एच चिस्ती हयांनी शंभरावर नागरिकांची तपासणी व उपचार करून मोफत औषधीचे वितरण करित स्वस्थ आरोग्या विषयी मार्गदर्शन केले.

 शिबीराला कन्हान-पिपंरीच्या नगरसेविका  रेखाताई टोहणे, नगरसेवक राजेशी यादव, माजी उप सरपंच कैलासजी भिवगडे, समाजसेवक प्रदीप बावणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवशक्ती आखाडा बोरी अध्यक्षा पायलताई येरणे हयांनी नागरिकांशी संपर्क करून आरोग्य शिबीराचा लाभ घेण्यास प्रेरित केले. शिबीरास राजे ग्रुप कन्हान, स सु मा ज्योतीबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी, युवा चेतना मंच, नेहरू युवा केंद्र आदी सामाजिक संस्थानी सहकार्य करून यशस्विते करिता केतन भिवगडे, निलेश गाडवे, रितेश जनबंधु , शाम मस्के, रोशन सोनटक्के, अनिकेत मेश्राम, स्वप्नील भिवगडे ने परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदतर्फे छोटेखानी नियुक्ती कार्यक्रम संपन्न

Wed Nov 11 , 2020
डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदतर्फे छोटेखानी नियुक्ती कार्यक्रम संपन्न     कन्हान : –  डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदे तर्फे नुकतेच एका छोटेखानी नियुक्ती कार्यक्रमाचे विभागीय कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम जळते,  प्रमुख अतिथी विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर,  विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे यांच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta