चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी*

*चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी*

कन्हान – चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करुन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण व पुष्प अर्पित करुन नागरिकांना मास्क , अन्न धान्य वाटप करुन बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .
बुधवार दिनांक २६ मे २०२१ ला बुद्ध पौर्णिमा निमित्य चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष काॅंग्रेस कमेटी कन्हान शहर महिला अध्यक्ष रिता बर्वे व प्रमुख अतिथि कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई अमितकुमार आत्राम यांच्या हस्ते
तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात नागरिकांना मास्क , अन्न धान्य वाटप करण्यात आले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन बुद्ध वंदना करीत बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात आली .


या प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे जयलाल सहारे , विरेंन्द्र चौधरी , रोहित बर्वे , चंदन मेश्राम , दिपक तिवाडे , सुमित जांबुळकर , दामु पात्रे , प्रकाश देवांघण , गणेश खांडेकर , विनोद मसार , महाविर यादव , क्रिष्णा रोडेकर , अक्षय फुले , सह आदि नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

तारसा रोड चौकात अनावश्यक फिरणा-या ६४ लोकांची अँटीजेन तपासणी. 

Fri May 28 , 2021
तारसा रोड चौकात अनावश्यक फिरणा-या ६४ लोकांची अँटीजेन तपासणी.  कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड चौक येथे कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या सहकार्याने मोबाईल बुथ मोहीम राबवुन अनावश्यक फिरणा-या २८ लोकांची कोव्हीड-१९ अँटीजेन तपासणी करण्यात आली.       गुरूवार (दि.२७) व (दि.२८) मे ला कन्हान […]

You May Like

Archives

Categories

Meta