शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच : १३ नोव्हेबरला भाजपाचे चुन भाकर आंदोलन

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच

*_१३ नोव्हेबरला भाजपाचे चुन भाकर आंदोलन_*

कामठी : महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी, पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचली नाही. विदर्भातील व मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सवांद कार्यक्रमात फराळ करा, रोषणाई करा असे वारंवार म्हटले परंतु आज शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच आहे. ना गोड धोड, ना रोषणाई म्हणून शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी काळी दिवाळी आहे.
     शेतकरी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना दिवाळीच्या पर्वावर चुन भाकर, पिठलं भाकर देऊन काळी दिवाळी साजरी करतील. भाजपा व भाजपा किसान मोर्चा तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर 13 नोव्हेंबरला शेतकरी धरणे देतील , चुन भाकर खातील आणि तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनाही चुन भाकर खायला देतील.

जाहिराती करिता संपर्क 7020602961

या आंदोलनाच्या मागण्या सरकारला जागे करण्यासाठी आहे.
१) महाराष्ट्रमध्ये अतिवृष्टी, सततच्या पाऊस व पुरामुळे झालेल्या शेती व पिकाचे फळबाग झालेल्या नुकसानभरपाई सरसकट दिवाळीपूर्वी कोरडवाहु ला २५००० व बागायतीला हेक्टरी ५० हजार रुपये प्रमाणे देण्यात यावी . तुटपुंज्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नये, कापसाची बोंडअळी बोंडसळी, सोयाबीन, धानाचे झालेले नुकसान, संत्राची फळगळती याकरिता शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यात यावी.
२) केंद्राच्या MSP कायद्यान्वये १८ प्रकारच्या भरड धान्याची, कापसाची खरेदी केंद्र मुबलक प्रमाणात सुरु करावीत. व दिवाळीतही खरेदी सुरु ठेवावी.
३) यावर्षी शेतकऱ्यांना कर्ज फेडणे अश्यक्य आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट करण्यात यावी.
४) हवामानवर आधारित फळ पीक विमा योजनेचे महाराष्ट्र सरकारने बदललेले निकष अन्यायकारक असून फक्त विमा कंपन्याच्या फायद्याचे आहेत. संत्रा केळी व इतर फळबागांच्या विमाचे बदललेले निकषते त्वरित रद्द करून जुने २०१८-१९ चे निकष कायम करण्यात यावे.
५) किसान क्रेडीट कार्डची अंमलबजावणी प्रभावीपने करण्यात यावी.
६) सध्या कृषी पंपाचे वितरण मार्च 2018 नंतर संपूर्णत बंद आहे ट्रान्सफार्मर जळला तरी नादुरुस्त ट्रान्सफार्मर २४ तासात देऊन दिवसा किमान वीजपुरवठा द्या.
७) रासायनिक खते, बियांनाचा रास्त दरात सुरळीत पुरवठा करा.
८) कृषी यांत्रिकीकरण, सुष्म सिंचन , नानाजी देशमुख कृषी समृद्धी अभियान तातडीने सुरू करण्यात यावे.
या सर्व मागण्यांकरिता भारतीय जनता पक्ष 13 नोव्हेंबरला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष . चंद्रकांतदादा पाटील व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आंदोलन करणार आहे. तरी ह्या आंदोलनात सर्व शेतकरी व कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे महामंत्री . चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष . डॉ. अनिल बोंडे ,कामठी तालुका अध्यक्ष एड आशिष वंजारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी घेतला लाभ.   

Wed Nov 11 , 2020
नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी घेतला लाभ.  कन्हान : – रेल्वे स्टेशन रोड कन्हान स्थित मल्टीस्पेलीटी क्लीनीक येथे राजे ग्रुप कन्हान व सामाजिक संस्था व्दारे आयोजित नि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी उपचार व मौफत औषधाचा लाभ घेतला.         रविवार (दि.८) ला मल्टीस्पेलिटी क्लीनीक रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथे […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta